Thursday, May 2, 2024
Homeनगरकाम न करणार्‍यांबाबत वेगळा विचार

काम न करणार्‍यांबाबत वेगळा विचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवा कार्यकर्ते हीच पक्षाची शक्ती आहे. युवकांनीच जिल्ह्यात बदल घडवला असून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले.

- Advertisement -

राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असून विविध प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी अधिक सक्षमपणे राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढवण्याची गरज आहे. येणार्‍या काळात राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकार्‍यांनी काम न केल्यास वेगळा विचार करावा लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी दिला.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षनिरीक्षक मासाळ बोलत होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, काकासाहेब तापकिर, रोहन साबळे, चंद्रकांत मरकड, शरद शिंदे, नरेंद्र जाधव, नितीन धांडे, ऋषीकेश गायकवाड, विक्रम कळमकर, मनोज भालसिंग, निलेश गोडसे, संतोष पवार, रवी माळुंजकर, संदीप सोनवणे, चारुदत्त शिंगर, नवाझ कुरेशी आदींसह युवकचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फिजीकल डिस्टन्स व सर्व नियम पाळून सदर बैठक घेण्यात आली. या बैठकित युवक पदाधिकार्‍यांनी विविध सूचना मांडल्या. युवकचे जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, राष्ट्रवादीत युवकांना संधी दिली जात असून, त्यांच्या कार्याचा सन्मान देखील केला जात आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणखी बळकट करण्यासाठी युवकांना अंग झटकून काम करावे लागणार आहे. युवक पक्षाशी जोडला गेल्यास जिल्हा राष्ट्रवादीमय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदारांच्या विजयात मोठा वाटा

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणण्यात युवक राष्ट्रवादीचा वाटा मोठा आहे. युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळमळीने पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचविल्याने पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे देखील युवक राष्ट्रवादीने यापेक्षा मोठे यश निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत, पक्ष तुमच्या पाठीशी खंबीर असल्याचा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या