Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याNDA सरकारचा अर्थसंकल्प 'या' तारखेला निर्मला सीतारमण करणार सादर

NDA सरकारचा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला निर्मला सीतारमण करणार सादर

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशात काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएचे सरकार (NDA Government) स्थापन होऊन अठरावी लोकसभा गठीत झाली. नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची ही तिसरी टर्म आहे. त्यानंतर आता मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून अर्थसंकल्पाच्या तारखेची घोषणा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी आपल्या एक्स (ट्विट) या सोशल मीडिया हॅण्डलरवरून केली आहे.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

रिजीजू यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया (Social Media) हॅण्डलरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारत सरकारच्या शिफारशीनुसार देशाच्या राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांना २२ जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत बोलवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ हे २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. तसेच १२ ऑगस्ट हा अर्थसंकल्पाचा शेवटचा दिवस असेल”, अशी माहिती देखील रिजिजू यांनी दिली.

हे देखील वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, १८ व्या लोकसभेचे (Loksabha) पहिले अधिवेशन (Session) नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चा पार पडली. त्यानंतर अधिवेशनाला विराम देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा २२ जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) करदात्यांसाठी काही लाभांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : भरधाव कार पुलाचा कथडा तोडून गोदावरी नदीपात्रात उलटली

तसेच या वर्षात दोनदा अर्थसंकल्प (Budget) सादर होत आहे. याआधी निर्मला सीतारमण यांनी ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर आता नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्पही त्याच सादर करत आहेत. सलग सातवेळा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरणार आहेत. याआधी माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या