Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच काही जिल्ह्यांतील धरणांच्या (Dam) पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईपासून त्या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : भरधाव कार पुलाचा कथडा तोडून गोदावरी नदीपात्रात उलटली

यांनतर आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मराठवाड्यात (Marathwada) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात (Vidarbha) देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बारसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात महिनाभरात ‘इतके’ टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

तर या आठवड्यात मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच वादळाचा (Storm) देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर या काळात महाराष्ट्रात (Maharashtra ) वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी राहील असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
.
दरम्यान, हवामान विभागाकडून पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज आणि पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी करण्यात आला आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या