Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याविकासासाठी मुद्यांवर आधारित संंवाद गरजेचा : बनसोड

विकासासाठी मुद्यांवर आधारित संंवाद गरजेचा : बनसोड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

परस्परांशी संलग्न असणार्‍या शहर व ग्रामीण यांची सांगड घालून विकासाची कल्पना मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी सातत्याने परस्परांमध्ये संवाद ठेवण्याची गरज असून, प्रशासनातील अधिकारी, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्यात मुद्दांवर आधारित संवाद साधला गेला( Point Based discussion) तर खर्‍या अर्थाने सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड (ZP CEO- Leena Bansod )यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

नाशिक सिटीझन फोरमच्या (Nashik Citizen Forum)नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा व मागील तीन महिन्यांत देण्यात आलेल्या बेस्ट सिटीझन पुरस्कारांचे वितरण बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सर्वप्रथम विकास म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे सांगून, कोवीडने आर्थिक, भौतिक विकासाच्या सर्व संकल्पना मोडीत काढल्याचे सांगितले. आधी काय नको, यावर विचार केल्यानंतर काय हवे? याचा मार्ग सापडणार असल्याचे सांगितले. केरळप्रमाणे शहराच्या ‘जबाबदार पर्यटनाचा’ विकास करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

पर्यावरणपूरकतेचा विचार ठेवल्यास विकास योग्य दिशेने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिटीझन फोरमचे उद्दिष्ट व आपले विचार यात साम्य असल्याने लिना बनसोड यांना मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यमान अध्यक्ष हेमंत राठी यांनी नुकत्याच झालेल्या सिटीझन फोरमच्या बैठकीत नूतन अध्यक्षपदी आशिष कटारीया यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी आशिष कटारीया यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात उपाध्यक्षपदी सचिन गुळवे, सरचिटणीसपदी शरण्या शेट्टी, खजिनदारपदी संदीप सोनार व विक्रम कपाडीया यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी मंडळात शीतल सोनवणे, स्नेहा दातार, संदीप शिंदे, अ‍ॅड. अनिल आहुजा, अश्विन कंदोई यांची निवड जाहीर करण्यात आली.

पाहुण्याच्या हस्ते मागील तीन महिन्यांतील बेस्ट सिटीझन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड, सामाजिक कार्यात अग्रेसर स्वामी श्रीकंंठानंद तसेच ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलले प्रमोद गायकवाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नूतन अध्यक्ष आशिष कटारीया यांनी आगामी काळातील सिटीझन फोरमच्या कामाची दिशा स्पष्ट करताना जगातील विविध शहरांच्या विकासाची तुलना नाशिकच्या विकासाशी करणारी चित्रफित सादर केली. त्यात त्यांनी पर्यटन, पर्यावरण, वाहतूक, बेकायदेशिर होल्डिंग, जनजागृती कार्यक्रम, यांचा विशेष तौलनिक अभ्यास सादर केला.

सूत्रसंचलन संदीप गुळवे यांनी केले. पाहुण्याचां परिचय शरण्या शेट्टी यांनी करुन दिला. पुरस्कारार्थींच्या निवडीची प्रक्रिया विवेक पाटील यांनी विषद केली. तर आभार संदीप सोनार यांनी मानले.

यावेळी नाशिक सिटीझन फोरमचे संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा( Vikram Sarada, founder president of Nashik Citizen Forum), माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, डॉ. नारायण विंचूरकर, सुनील भायभंग आदींसह सिटीझन फोरमचे पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या