Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकरने दहा दिवस आधीच मिळवला होता...

NEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकरने दहा दिवस आधीच मिळवला होता ‘नीट’ पेपर; CBI ची कोर्टात माहिती

मनीषा मांढरे निलंबित

पुणे | प्रतिनिधी | Pune

नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात (NEET UG Paper Leak Case) सीबीआयने (CBI) सोमवारी महाराष्ट्रात मोठी कारवाई केली. लातूर आणि नांदेड येथील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना ११ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली असून नऊ दिवस सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील ही १० वी अटक असून, यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सीबीआयने न्यायालयात (CBI Court) दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या १० दिवस आधीच, म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी मोटेगावकर यांच्याकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरे उपलब्ध होती. त्यांनी हा पेपर विवेक पाटील व अनेक विद्यार्थ्यांना (Student) आर्थिक मोबदल्यात पुरवला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मोबाईलमधील तांत्रिक माहिती डिलीट केली होती, मात्र सीबीआयने डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. तपासात नांदेडमधील एका पालकाने आपल्या मुलीसाठी ५ लाख रुपयांत पेपर खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

मोटेगावकर यांनी पूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरे (Manisha Mandhre) आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून हे रॅकेट चालवल्याचा संशय आहे. डॉक्टर घडवण्याची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरसीसी क्लासेसच्या मॉक टेस्ट मधील प्रश्न मूळ परीक्षेशी असत. जुळत मोटेगावकर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, त्यांनी दिलेला ४२ प्रश्नांचा गेस पेपर मूळ पेपरशी तंतोतंत जुळल्याचा दावा केला होता. याच व्हिडिओमुळे सीबीआयचा संशय बळावला.

दरम्यान, पुण्यातील सीबीआय कार्यालयात (Pune CBI Office) झालेल्या चौकशीत संशयास्पद आर्थिक व्यवहार, पॅन कार्ड्स आणि ओळखपत्रांचे धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. ही एक मोठी आंतरराज्य साखळी असून, दिल्ली आणि पुणे सीबीआयचे पथक संयुक्तपणे याचा तपास करत आहे. आगामी काळात यात आणखी काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.

मनीषा मांढरे निलंबित

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने ही कारवाई केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...