Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशमहाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू!

महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू!

दिल्ली । Delhi

नेपाळमध्ये बसचा भीषण अपघात (Nepal bus accident) झाला आहे. ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील तनहुन (Tanahun) जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मार्सयांगडी (Marsyangdi) नदीत कोसळली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पोखराहून (Pokhara) काठमांडूला (Katmandu) जात होती. यामध्ये महाराष्ट्रातील १४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर नोंदणीकृत असलेली ही बस प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती.

हे हि वाचा : गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! ९ जणांसह जनावरे होरपळली

नेपाळ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय प्रवासी घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मार्सयांगडी नदीत कोसळली. बसमध्ये ४० प्रवासी होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र १४ जणांचा मृत्यू झाला आहे. केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस (UP 53 FT 7623) गोरखपूरहून नेपाळला गेली होती.

बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी मार्सयांगडी नदीत बस पडली. आज (शुक्रवार) ११.३० वाजात ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु त्यात महाराष्ट्रातील प्रवाशी आहेत अशी माहिती समोर येत आहे. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

हे हि वाचा : प्रिंसिपल कॅबिनमध्येच विद्यार्थ्यी एकमेकांत भिडले; कॉलेजच्या प्राचार्यांनाही मारहाण

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या