पुणे | Pune
सबसे कातिल गौतमी पाटील…हा डायलॉग राज्यात प्रचंड गाजला आहे. गौतमी अन् गर्दी हे जणू आता समीकरणच झाले असून राज्यातील असा एकही जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम झाला नाही…
तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. तिचं नाचणं, तिचे कपडे, तिचे अंगविक्षेप, तिचं बोलणं यामुळे तिच्यावर नेहमीच टीका होताना दिसते. गौतमी सतत चर्चेत असतेच आता तर तिच्या आडनावावरुन ती चर्चेत आली आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे.
राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, गद्दारांच्या…
गौतमीचे आडनाव पाटील नव्हे तर चाबुकस्वार आहे. गौतमीने आतापर्यंत तिचं खरं आडनाव लपवून ठेवलं असून ती पाटील हे आडनाव लावून फिरत असल्याचा आरोप, मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. काल पुण्यात गौतमीच्या आडनावावरून एक बैठक पार पडली. यावेळी तिचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचे सांगण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
टाटा समूहाचा जगभरात डंका; टॉप 20 कंपन्यांमध्ये समावेश
गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरू नये. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.