Friday, May 3, 2024
HomeUncategorizedराज्याची सुधारित नियमावली: जीम, ब्युटी पार्लर अन् सलूनसाठी हे असतील नियम

राज्याची सुधारित नियमावली: जीम, ब्युटी पार्लर अन् सलूनसाठी हे असतील नियम

महाराष्ट्र सरकारने शनिवारी निर्बंध (new guidelines)जाहीर केले होते. त्यात रविवारी सुधारणा करण्यात आली. नवीन नियमावलीत आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम (salon beauty parlour)संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे नवे आदेश(new guidelines) रविवारी जारी करण्यात आले आहेत.

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

- Advertisement -

१० जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. तसंच जीमसुद्धा ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहे. याआधी दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

सौंदर्य सलूनसाठी 50% क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल . सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही अश्याच सेवा सुरु राहतील. फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.

असे असतील निर्बंध

१. सकाळी पाच वाजेपासून रात्री ११ पर्यंत ५ पेक्षा अधिक नागरिकांना प्रवास करून नये

अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत सर्व बंद राहील.

२. शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी आवश्यक

३. शासकीय कामासाठी गरज असल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स पर्याय वापरावा

४. मुख्यालयाच्या बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तींनी बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्यात

५. शासकीय कार्यालयात कमीत कमीत संख्येत काम करावे जास्तीत जास्त संख्येने घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे

६. संसर्ग रोखण्यासाठी वर्तन पाळावे त्याचे पालन हेड ऑफिसने करावे

७. थर्मल स्कनर, सनीटायझर गरजेचे

८. खासगी ऑफिससेस ५० टक्क्यांनी काम करतील

९. खासगी ऑफिसेस सोयीस्कर वेळा ठरवाव्यात

१०. शिफ्टमध्ये २४ तास कामे करण्यास हरकत नाही

११. नियमित हालचाल ऑफिससाठी आवश्यक असल्यास ओळखपत्र बंधनकारक

१२. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी

१३. पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांनी कार्यालयात यावे

१४ लग्नासाठी ५० नातलगांची उपस्थिती बंधनक्रारक

१५ .अंत्यविधीसाठी २० नागरिकांची उपस्थिती

१६ इतर सांस्कृतिक कार्यक्रम ५० नागरिकांची उपस्थिती

१७. शाळा कॉलेजेस कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

१८. शाळा आणि कोचिंग क्लासेसने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु ठेवावा

१९. कार्यालयीन कामकाज चालू राहील

२९. हॉटेल्स, रेस्टारंट ५० टक्यांनी सुरु, लसीकरण गरजेचे, होम डिलिव्हरी सुरु राहील

३०. आंतरराष्ट्रीय प्रवास भारत सरकारच्या नियमाप्रमाणे लागू

३१. मालवाहतूक कार्गो वाहतूक, सार्वजिक वाहतूक केवळ लसीकरण झालेल्या व्यकींच्या मार्फतच होईल

…तर राज्यातील बार, दारुची दुकाने बंद

- Advertisment -

ताज्या बातम्या