Friday, May 3, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याच्या आवकेत वाढ

घोडेगावात कांद्याच्या आवकेत वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) काल सोमवारी आठवड्याच्य पहिल्या दिवशी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) जवळपास 23 हजार गोण्यांनी वाढ झाली. सोमवारच्या लिलावासाठी 330 वाहनांतून 59 हजार 558 गोण्या कांदा लिलावासाठी (Onion Auction) आला होता. जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले.

- Advertisement -

सध्या सर्व नवीन लाल कांद्याचीच आवक (Onion Inward) होत आहे. एक-दोन लॉटला 2800 ते 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या कलर पत्तीवाल्या कांद्याला 2300 ते 2700 रुपयांचा भाव मिळाला. मुक्कल भारी कांद्याला 2 हजार ते 2200 रुपये भाव मिळाला. गोल्टा कांद्याला 1500 ते 1800 रुपये, गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 300 ते 400 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या