Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात 23 गावांतून 59 संक्रमित

नेवासा तालुक्यात 23 गावांतून 59 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 23 गावांतून काल 59 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले. देडगाव, पाचुंदा व नांदूरशिकारी येथे प्रत्येकी 6 बाधित आढळून आले.

- Advertisement -

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या गवांमध्ये संक्रमितांची संख्या सर्वाधिक 27 आहे. देडगाव व नांदूरशिकारी येथे प्रत्येकी 6 जण बाधित निघाले. तेलकुडगाव येथे दोघे तर देवसडे, भेंडा खुर्द, भेंडा बुद्रुक व देवगाव या चार गावांत प्रत्येकी दोघे बाधित आढळले. जेऊरहैबती, कुकाणा व सुकळी येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

शिरसगाव केंद्रांतर्गत दहाजण बाधित आढळले असून पिंपरीशहाली व पाथरवाला येथे प्रत्येकी चार तर शिरसगाव येथे दोघे संक्रमित आढळले.

नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नेवासा खुर्द व गोमळवाडी येथे प्रत्येकी चार तर तामसवाडीत एक बाधित आढळला.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 8 जण बाधित आढळले. पाचुंदा येथे 6 तर चांदा व महालक्ष्मीहिवरे येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

सोनई केंद्रांतर्गत खेडलेपरमानंद येथे दोघे तर लोहगाव येथे एक बाधित आढळला. नेवासा बुद्रुक केंद्रांतर्गत बेलपांढरी येथे एकजण बाधित आढळला. सलाबतपूर केंद्रांतर्गत मंगळापूर येथे एकजण बाधित आढळला. टोका व उस्थळदुमाला या दोन केंद्रांतर्गत काल एकही संक्रमित आढळून आला नाही.

अशाप्रकारे तालुक्यातील 23 गावांतून काल 59 करोना संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 13 हजार 613 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या