Friday, May 3, 2024
Homeनगरघोडेगावात कांदा आवक वाढली

घोडेगावात कांदा आवक वाढली

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची 290 वाहनांमधून 52 हजार 849 गोण्या (29 हजार 67 क्विंटल) आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1400 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 1350 ते 1400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

मोठा कलरपत्ती कांद्याला 1250 ते 1300 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये, हलका डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपयांचा भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या