Monday, October 14, 2024
Homeनगरदीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखले

दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास 727 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोरील प्रांगणात करण्यात आलेल्या दीपउत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले.

- Advertisement -

जमावाच्या हाणामारीत आरोपी अण्णा वैद्यचा मृत्यू

या दीपोत्सवाप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाची विधीवत पूजन करण्यात येऊन पैस खांबासह माऊली समोर क्षेत्र आळंदी येथील समाधी मंदिरातुन आणलेल्या ज्योत ने मंदिरातील पहिला दिवा पेटवण्यात आला. आ. शंकरराव गडाख व हिंदू राजे मित्र मंडळाच्यावतीने हि ज्योत आणली होती. तदनंतर ओम आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये संस्थानचे अध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, डॉ करण घुले, विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, सुरेश ढोकणे, अनिल ताके, अ‍ॅड के.एच. वाखुरे, देविदास साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांच्यासह संत, महंत व सर्व विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

नेहरु गार्डनमधील रेल्वे गाडी रुळावरुन घसरली

यावेळी महिला मंडळींच्या हस्ते दीप पेटवून संत ज्ञानेश्वर मंदिरावर व मंदिराच्या पायर्‍यावर दीप लावण्यात आले. आळंदी येथे संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना माऊलीची कर्मभूमी असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलीचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैसखांबास पहिला दीप अर्पण करून मंदिरावर 727 दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करून माऊलीला अभिवादन करण्यात आले. ओम आकाराच्या बनविण्यात आलेल्या लोखंडी प्रतिकृतीमध्ये लावण्यात आलेले दिव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या