Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवाशाच्या मापारीविरोधात नगरमध्ये गुन्हा

नेवाशाच्या मापारीविरोधात नगरमध्ये गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाला अनधिकृतपणे उतारा जोडून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी नेवासा येथील स्वप्नील राजेंद्र मापारी याच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण (वय 53, रा. सूर्यानगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

स्वप्नील राजेंद्र मापारी याने 16 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचा भाऊ अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या वाणी जातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणात जोडलेला गणपती महादू (आडनाव नमूद नाही) यांना मुलगी झाल्याचा सन 1920 चा गाव नमुना नं. 14 चा उतारा अर्जदार अदित्य बालाजी भवर (रा. खामगाव ता. नेवासा) याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाला अनधिकृतपणे जोडून तसा प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर केला होता.

यासंदर्भात निरीक्षक पठाण यांनी चौकशी केली असता चौकशी दरम्यान असे समोर आले की, आदित्य बालाजी भवर याचा वाणी जातीदावा प्रस्ताव नातेवाईक स्वप्नील राजेंद्र मापारी याने तयार केला असून तो समितीकडे सादर केला आहे. यामध्ये त्याने त्याचा भाऊ अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या वाणी जातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणात जोडलेला गणपती महादू (आडनाव नमूद नाही) यांना मुलगी झाल्याचा सन 1920 चा गाव नमुना नं. 14 चा उतारा जोडला आहे. सदरचा उतारा जोडून आदित्य बालाजी भवर यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या