Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात 18 गावांतून आढळले 28 करोना संक्रमित

नेवासा तालुक्यात 18 गावांतून आढळले 28 करोना संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka)18 गावांतून काल 28 करोना बाधित (Covid 19 Positive) आढळून आले. मुकिंदपूर येथे सर्वाधिक चौघे बाधित आढळले.

- Advertisement -

नेवासा (Newasa) खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) अंतर्गत नेवासा खुर्द येथे तिघे तर गोमळवाडी येथे एक संक्रमित आढळला.

टोका प्राथमिक आरोग्य केंद्रा (Toka Primary Health Center) अंतर्गत बाभुळखेडा व बकुपिंपळगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

सोनई केंद्राअंतर्गत (Sonai Primary Health Center) वंजारवाडी, सोनई, वांजोळी, झापवाडी व पानेगाव या पाच गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. सलाबतपूर केंद्राअंतर्गत मुकिंदपूर येथे चौघे बाधित आढळून आले.

शिरसगाव केंद्राअंतर्गत पिंप्रीशहाली व सुलतानपूर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. कुकाणा केंद्राअंतर्गत नांदूरशिकारी येथील एकजण संक्रमित आढळला.

उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत खरवंडी येथे तिघे तर वडाळा बहिरोबा येथील एकजण बाधित आढळून आला. चांदा केंद्राअंतर्गत घोडेगाव, कौठा व रस्तापूर या तीन गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले.

अशाप्रकारे तालुक्यातील 18 गावांतून काल 28 करोना बाधित आढळून आले असून तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 14 हजार 607 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या