Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची 'जय महाराष्ट्र,...

शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ घोषणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीचे (Mahayuti) ०९ तर महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले होते. आज या सर्व ११ विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला असून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिली.

विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर आणि भावना गवळी यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ म्हटलं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : नाट्यसृष्टीने पवार, फडणवीस अन् शिंदेंकडे दुर्लक्ष केलं; संजय राऊतांची खोचक टीका

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले.

तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले. दरम्यान भावना गवळी यांनी शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यामागील कारणही सांगितलं. नाथांचे नाथ म्हणून आपण स्मरण करतोच. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मी आज सभागृहात पोहोचली आहे. अनेक समाजकार्य, राजकारण केल्यानंतर मी सभागृहात पुन्हा एकदा परतली आहे. दिल्लीतून मुंबईत येण्याची संधी प्रथमच मिळत आहे, असं भावना गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

कोण कोणत्या आमदारांनी घेतली शपथ?

पंकजा मुंडे – भाजप
योगेश टिळेकर – भाजप
अमित गोरखे – भाजप
परिणय फुके – भाजप
सदाभाऊ खोत – भाजप
भावना गवळी – शिंदे शिवसेना
कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रज्ञा सातव – काँग्रेस
मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे ०९ आणि महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या शेकपचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्याचे प्रथमदर्शन दिसून आले होते. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वरचष्मा दिसून आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या