Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशGST Reform: "नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म" नव्या GST सुधारणेत सर्व सामान्यांना मोठा...

GST Reform: “नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म” नव्या GST सुधारणेत सर्व सामान्यांना मोठा दिलासा; काय स्वस्त होणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्र सरकार ने GST (Goods and Sevices Tax) मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा जाहीर केली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी घेतलेल्या निर्णयात, कराचे सध्याचे चार स्लॅब कमी करून फक्त दोन करण्यात आले आहेत. आता 12% आणि 28% वाले स्लॅब बंद करण्यात आले असून फक्त 5% आणि 18% कर राहील. आज या परिषदेचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आजही अनेक मोठे बदल होऊ शकतात.

जीएसटी लागू केल्यापासून आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी सुधारणा आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील तेल, टुथपेस्ट, शॅम्पूसह खाण्या पिण्याच्या वस्तू आता ५ % स्लॅबमध्ये येणार आहे. आरोग्य आणि विम्यावर यापुढे कोणताही जीएसटी लागू राहणार नसल्याचे ठरवण्यात आले आहे.

- Advertisement -

सरकारने याला “नेक्स्ट-जनरेशन जीएसटी रिफॉर्म” असे नाव दिले आहे, हे बदल येत्या २२ सप्टेंबर पासून देशभरात लागू केले जाईल. याचा थेट परिणाम सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय आणि लहान व्यावसायिकांवर होणार आहे.

YouTube video player

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. दिवळी गिफ्ट म्हणत यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे शाम्पू, सोप, टूथपेस्ट, सेव्हिंग क्रीम, पनीरसह अनेक वस्तू स्वस्त होणार आहे. १२ टक्क्यांमधील काही वस्तू या ५ टक्क्यांमध्ये आणण्यात आल्या आहेत. जीएसटीमध्ये बदल केल्याचा फायदा आता शेतकऱ्यांनाही होणार आहे. ट्रॅक्टरचे टायर, सुटे भाग आणि ट्रॅक्टरवर आता फक्त ५% कर आकारला जातो.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शेतीसाठी लागणाऱ्या विविध साधनांवरील करदर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सुधारीत साधने खरेदी करणे अधिक सोयीस्कर होणार असून त्याचा थेट फायदा त्यांच्या उत्पादनक्षमतेला होईल.

शिक्षणाशी संबंधित वस्तू करमुक्त
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित अनेक वस्तू आता पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत. नकाशे, चार्ट, ग्लोब, व्यायाम पुस्तके, नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल आणि खोडरबर यावर पूर्वी ५% किंवा १२% कर लागत होता, मात्र आता तो शून्य करण्यात आला आहे. यामुळे शालेय शिक्षणाशी संबंधित खर्चात लक्षणीय घट होईल आणि पालकांना मोठा दिलासा मिळेल.

गाड्या विकत घेणंही होणार स्वस्त
ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी देखील कर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता काही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहने, जी पूर्वी २८% कर स्लॅबमध्ये होती, ती १८% स्लॅबमध्ये आणण्यात आली आहेत. तीनचाकी वाहने ,350cc पर्यंतच्या मोटारसायकल, आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरही आता १८% जीएसटी आकारला जाईल. यामुळे ऑटो क्षेत्राला चालना मिळेल आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त होतील.

इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे होणार स्वस्त
ए.सी. , ३२ इंचापेक्षा मोठे एलईडी/एलसीडी टीव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर आणि डिशवॉशरवरील जीएसटी आता २८% वरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे गृहपयोगी वस्तूंच्या किमती कमी होतील घरगुती वस्तुंवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्यांना होणार फायदा
जीएसटी दरांमधील या बदलांमुळे महसुलात नुकसान होण्याची भीती काही विरोधी पक्षशासित राज्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सत्ताधारी एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) या सुधारणांना पाठिंबा दिला आहे. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पाय्यावुला केशव यांनी हा निर्णय सामान्य जनतेच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या आराखड्यानुसार, वस्त्रोद्योग, खते, नूतनीकरणीय ऊर्जा, वाहन उद्योग, हस्तकला, शेती, आरोग्य आणि विमा यांसारख्या आठ प्रमुख क्षेत्रांना या दर सुधारणांचा मोठा फायदा होईल. तसेच, यामुळे एमएसएमईंना नियमांचे पालन करणेही सोपे होईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...