Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूज२०० टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार, NHAI टोल घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; महाराष्ट्रासह १४...

२०० टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार, NHAI टोल घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; महाराष्ट्रासह १४ ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) टोल प्लाझांवर कथित बेकायदेशीर पद्धतीने टोल वसुली करून त्यातील रक्कम अधिकृत यंत्रणेबाहेर वळवल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. देशातील सुमारे २०० हून अधिक टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार होत असल्याचा संशय असून, त्या पार्श्वभूमीवर आज ईडीने महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे १४ टोलनाक्यांवर धाडी टाकल्या आहेत.

आज पहाटे सुरू झालेल्या या छाप्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता येथील 14 वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. ईडीच्या पथकांनी टोल कंत्राटदारांची निवासस्थाने आणि खाजगी कार्यालये, तसेच टोल व्यवस्थापन कंपन्यांच्या परिसराचीही तपासणी केली आहे.

- Advertisement -

या छापेमारीमध्ये तपास यंत्रणांना असे आढळून आले की NHAI च्या टोल नाक्यांवर कार्यरत असलेल्या काही खाजगी संस्था आणि गटांनी (सिंडिकेट) संगनमताने एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन विकसित केले होते. या सॉफ्टवेअरचा वापर करून वाहनचालकांना टोलच्या बनावट पावत्या दिल्या जात होत्या आणि त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कम NHAI च्या अधिकृत प्रणालीमध्ये कधीच नोंदवली जात नव्हती. परिणामी, दररोज जमा होणारी लाखो रुपयांची टोलची रक्कम थेट खाजगी खात्यांमध्ये वळवली जात होती. टोल नाक्यावरील कर्मचारी, संचालकांच्या संगनमतातून हे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

फाशीची तयारी…मनोज जरांगेंसमोर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय बोलून गेल्या

NHAI च्या डेटा विश्लेषण आणि तांत्रिक तज्ज्ञांनी फॉरेन्सिक ऑडिटदरम्यान हे सॉफ्टवेअर शोधून काढले. या सॉफ्टवेअरचा वापर करून प्रणालीमध्ये समांतर आणि बनावट नोंदी केल्या जात असल्याचे उघड झाले. ईडीची पथके सध्या संबंधित ठिकाणांवरील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्व्हर डेटा, हार्ड डिस्क आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहेत.

या घोटाळ्यात ‘फास्टॅग’ (FASTag) नसलेल्या किंवा फास्टॅग खात्यात अपुरे पैसे असलेल्या वाहनांकडून टोल गोळा केला जात होता. अशा वाहनांकडून देशभरात विहित दराच्या दुप्पट टोल आकारला गेला. धक्कादाक म्हणजे वाहनांकडून दुप्पट टोलची रक्कम वसूल केली जात असताना कर्मचारी बनावट पावत्या देऊन सदर रक्कम स्वतःच्या खिशात टाकत होते.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...