Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजफाशीची तयारी...मनोज जरांगेंसमोर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय बोलून गेल्या

फाशीची तयारी…मनोज जरांगेंसमोर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल काय बोलून गेल्या

जालना | Jalna
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असतानाच मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देत मित्तल यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान ‘फाशी’चा उल्लेख झाल्याने काही काळ वातावरण गंभीर झाले.

- Advertisement -

आशिमा मित्तल यांनी सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती जरांगे यांना दिली. यावर जरांगे यांनी, “तुम्ही सरकारची बाजू घ्यायला आला आहात का?” असा सवाल केला. त्यावर मित्तल यांनी प्रशासनाच्या भूमिकेतून सरकारची बाजू मांडणे हे आपले काम असल्याचे स्पष्ट केले.

चर्चेदरम्यान जरांगे यांनी सरकारवर टीका करताना चांगल्या-चांगल्या लोकांवर फाशी घेण्याची वेळ आणल्याचा उल्लेख केला. मात्र, मित्तल यांनी त्याचा संदर्भ स्वतःकडे घेतला आणि त्यानंतर मित्तल यांनी थेट म्हटले की, मनोजजी नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही माझी तयारी आहे. मित्तल यांचे हे बोलणे ऐकताच अंतरावाली सराटीत सर्वजण शांत झाले. मित्तल पुढे बोलत असतानाच जरांगे यांनी त्यांना थांबवले आणि बोलण्यास सुरूवात केली.

संपादकीय : २ सप्टेंबर २०२६ – हक्कासाठी आंदोलने का करावी लागतात?

तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही फाशी घेण्याची भाषा करू नका
मित्तल यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांना थांबवत “तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही फाशी घेण्याची भाषा करू नका,” असे सांगितले. एका प्रश्नावरून आपल्यावर टीका झाली तरी त्यासाठी अशा प्रकारची भाषा करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे यांनी मित्तल यांच्या प्रशासकीय भूमिकेचा उल्लेख करत, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरील नसून राज्यस्तरीय असल्याचे सांगितले. सरकारने प्रशासनातील अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुढे केल्याने त्यांची ऊर्जा वाया जाऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

जरांगे यांनी मित्तल यांच्या शिक्षणाचा आणि प्रशासकीय कारकीर्दीचा उल्लेख करत त्यांना अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. “तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचला आहात,” असे म्हणत त्यांनी मित्तल यांचा सन्मान असल्याचेही स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...