Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्या"औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच...''; निलेश राणेंची शरद पवारांवर जहरी टीका

“औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच…”; निलेश राणेंची शरद पवारांवर जहरी टीका

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असे चित्र असल्याचे म्हटले होते. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांची तुलना थेट औरंगजेबाशी करत ट्वीट केले आहे. त्यामुळे निलेश राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली

एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून निलेश राणेंनी (Nilesh Rane) शरद पवारांना लक्ष्य करत ट्वीट (Tweet) केले आहे. त्या ट्वीटमध्ये राणेंनी म्हणाले आहेत की, “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटते, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता निलेश राणे यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,पवारसाहेब वर्षानुवर्षे…

तर दुसरीकडे धार्मिक मुद्द्यावर केलेले विधान चर्चेत आल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी पवार म्हणाले की, “ख्रिश्चन व मुस्लीम समाज (Christian and Muslim Communities) धोक्यात आहे असे मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा?” असे त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या