Sunday, May 19, 2024
Homeनगरनिळवंडे धरणातून शेती व पिण्याचे आवर्तन सोडले

निळवंडे धरणातून शेती व पिण्याचे आवर्तन सोडले

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणातून (Nilwande Dam) आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेकने शेती (Farm) व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन (Drinking Water Rotation) सोडण्यात आले असल्याची माहीती भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी

हे आवर्तन (Rotation) साधारणतः 20 ते 25 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून (Nilwande Dam) उन्हाळी हंगाम सिंचन व बिगर सिंचन आवर्तन क्र.२ आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेक  विसर्गाने सुरू करण्यात आले आहे.

पवारांनी ‘राष्ट्रवादी’ला संभ्रमात टाकले

आवर्तन सोडतेवेळी 11 हजार 39 दलघफु क्षमतेच्या भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) 6  हजार 579  दलघफू व 8 हजार 320 क्षमतेच्या निळवंडे  धरणात 4 हजार 757 दलघफू पाणी शिल्लक होते. भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) 59:60 टक्के तर निळवंडे धरणात (Nilwande Dam) 57:12 टक्के पाणी शिल्लक आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी युवकांना काँग्रेसमध्ये मोठी संधी – आ. थोरात

- Advertisment -

ताज्या बातम्या