Monday, September 16, 2024
Homeनगर‘निळवंडे’त 45 टक्के पाणीसाठा

‘निळवंडे’त 45 टक्के पाणीसाठा

पावसाचा जोर ओसरला || आवक मंदावली

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

पाणलोटात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमध्ये आवक कमालीची मंदावली आहे. भंडारदरात काल अवघ्या 120 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा 9080 (82.25 टक्के) झाला होता. तर निळवंडेतील पाणीसाठा 3741 दलघफू (44.92 टक्के) झाला होता.

पाणलोटात तुरळक स्वरूपाचा पाऊस असून अधून-मधून सरी बरसत आहेत. काल दिवसभरात भंडारदरात 120 दलघफू पाण्याची आवक झाली. वीज निर्मितीसाठी 835 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने त्यासाठी 35 दलघफू पाण्याचा वापर झाला. तर 85 दलघफू पाणी धरणात जमा झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात सायंकाळी पाणीसाठा 9080 दलघफू झाला होता. काल दिवसभरातील भंडारदरातील पावसाची नोंद 4 मिमी झाली आहे. वाकी तलावातून होणारा विसर्गही कमी झाला आहे. तो सध्या 1298 क्युसेकने सुरू आहे. सकाळी निळवंडेतील पाणीसाठा 3630 दलघफू (43.59 टक्के) होता. त्यात काहीशी वाढ होवून हा साठा सायंकाळी 3741 दलघफूवर पोहचला.
गत 24 तासांत झालेला पाऊस असा मिमी-भंडारदरा 30, घाटघर 55, पांजरे 45, रतनवाडी 50. आढळा धरणातील पाणीसाठा 887 दलघफू (83.68टक्के) झाला आहे.

मुळा पाणलोटातही पावसाचा जोर ओसरल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 6260 क्युसेकवर आला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 14626 दलघफू झाला होता. पावसाचा जोर ओसरल्याने दारणाचा विसर्ग 2624 क्युसेकवर आला आहे, असल्याची माहिती राहाता तालुका प्रतिनिधीने दिली आहे. भावलीतून 481, कडवा 600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत पडणारा विसर्ग घटवून तो 3155 क्युसेक वर आला आहे. भाम धरणही 100 टक्के भरल्याने त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु झाला आहे. जायकवाडीत 1 टक्क्याच्या वर पाणी नव्याने दाखल झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या