Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘निमा’त पुन्हा वादाची ठिणगी पेटणार!

‘निमा’त पुन्हा वादाची ठिणगी पेटणार!

सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमाच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित केली असून या बैठकीला अठरा पदाधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाचे कारण देऊन विरोध दर्शवत उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटणार आहे.

- Advertisement -

निमातील सत्ता संघर्ष न्यायालयात पोचल्यानंतर धर्मदाय आयुक्त न्यायालयाने दोन्ही गटांना सत्ता देण्यास नकार दिला होता. सक्षम पर्याय अर्थात प्रशासक देण्याच्या याबाबतचा निर्णय त्यांनी बाजूला ठेवला असून, त्यावर लवकरच कारवाई केली जाईल असे त्यांनी निकालात म्हटले होते.

मात्र या निकालानंतरही विद्यमान संचालक मंडळ हे कार्यरत राहिलेली असून, त्यांनी नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला 18 सदस्यांनी ई-मेल द्वारे विरोध दर्शवत उपस्थित न राहण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा नियमातील पदभार कोणाकडे हा प्रश्न निर्माण होत आहे. याच्या निर्णयाचा सोईचा अन्वयार्थ काढला जात आहे किंवा कसे याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

न्यायालयाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नसताना विद्यमान कार्यकारी मंडळाने परस्पर कारभार चालवणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे.

मनीष रावल, निमा कार्यकारिणी सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या