Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणे दोन दिवसांच्या आरामासाठी गोव्यात; मोदींना भेटण्याची शक्यता

नितेश राणे दोन दिवसांच्या आरामासाठी गोव्यात; मोदींना भेटण्याची शक्यता

पणजी | panaji

संतोष परब (Santosh Parab) हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे (Nitesh Rane) यांना नुकताच जामीन (Bail) मंजूर झाला. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचे जाहीर केले होते….

- Advertisement -

मात्र नितेश राणे अचानक गोव्यात (Goa) दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

जामिनावर सुटका होताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला. ते म्हणाले की, मला आश्चर्य याचे वाटते आहे की, मला त्रास ज्याचा होतो. त्यानंतर कोल्हापूरवरुन (Kolhapur) डिस्चार्ज घेतल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ॲडमिट होणार आहे.

सुटकेनंतर नितेश राणे कडाडले! सरकार मला अटक करू शकले नाही…

हा सगळा आरोग्याचा विषय आहे तो न्यायालयीन कोठडी आहे म्हणून करतोय, असे म्हणणारे जे काही लोक माझी शूगर लेव्हल तपासायचे ते काय खोटे होते का? माझे 152 ब्लड प्रेशर होते. मी काय मशीनमध्ये बोट घातले होते का? कुणाच्याही तब्येतीवर असा प्रश्न विचारणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आहे का? हादेखील विचार केला पाहिजे.

Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

आम्हीही विचारु का, सरकार (Government) पडण्याची वेळ येते, ईडीची कारवाई होते, तेव्हाच गळ्यात पट्टा कसा येतो? हा प्रश्न आम्ही विचारावा का? अधिवेशनावेळीच मुख्यमंत्री आजारी का पडतात? मविआच्या नेत्यांना ईडीच्या (ED) कारवाईवेळीच करोना कसा होतो? त्यामुळे आरोग्याचे प्रश्नावर असा राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, याबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नितेश राणे म्हणाले.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

यावेळी नितेश राणे यांनी दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता नितेश राणे थेट गोव्याला (Goa) पोहोचल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यातील म्हापसा येथे सभा घेणार आहेत. उत्तर गोव्यातील १९ मतदारसंघासाठी ही सभा असणार आहे. नितेश राणे पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या