भारतीय जनता पक्षातील एका नेत्याबाबत विरोधकही विश्वास बाळगून असतात, ते नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले हे नेतृत्व सर्वसमावेशक म्हटले पाहिजे. धडाडीने विकासाचे निर्णय राबविण्याबाबत त्यांची देशभर ओळख आहे. स्पष्टवक्ता, हजरजबाबी आणि जनतेप्रती जबाबदारी या गुणांमुळे भारतीय राजकारणात त्यांची चर्चा होते.
27 मे 1957 ही त्यांची जन्मतारीख. नागपूर येथे 5.40 वाजता त्यांचा जन्म झाला. जन्मराशी मेष तर नक्षत्र अश्विनी-4 होय.
24 मार्च 2019 रोजी सुखस्थानातील गुरुची महादशा सुरू झाल्याने सध्या यशाची कमान उंचावण्याचे योग आहेत.तरीही गुरू लाभेष व अष्टमेशही असल्याने यशाबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याकडे सतत्याने लक्ष ठेवावे लागणार आहे. आरोग्याच्या कारणांमुळे एखादी आलेली संधी हातची जाणार नाही, यासाठी दक्ष राहावे लागेणार आहे.
22 मे 2024 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालखंडात आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न केल्यास जीवनातील सर्वोच्च संधी निर्माण करणारा राहील. याचा अर्थ 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे एखादी मोठी संधी चालून येणार असे संकेत आहेत. पण त्यासाठी त्यांना आपल्या राजकीय कुटुंबात आपल्याबाबत गैरसमज वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. कारण कुटुंबस्थानी मिथुनचे मंगळ तर बुध व्ययात चंद्रासह ग्रहणयोगात असल्याने अशी स्थिती उत्पन्न होण्याचे संकेत आहेत.