Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNMC : प्रभाग रचनेच्या कामाला गती

NMC : प्रभाग रचनेच्या कामाला गती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीच्या द़ृष्टीने प्रशासनाकडून 11 जूनपासून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. 17 जूनपर्यंत प्रगणक गटाची मांडणी करण्यात आल्यानंतर प्रारुप प्रभाग रचना तयार केली जात आहे. 17 ते 18 जूनदरम्यान जनगणनेची माहिती तपासण्यात आली असून गुरुवार (दि.19) पासून मनपा आयुक्त प्रमुख असलेल्या मुख्य समितीकडून स्थळ पाहणी सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान सोमवारपर्यंत सर्व प्रभागात स्थळ पाहणी सुरु असून मंगळवारी (दि.23) नंतर गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागासाठी 2807 प्रगणक गट तयार करण्यात आले आहे. प्रगणक गट मिळूनच प्रभागाची निर्मिती केली जाते. साधारणत: एका प्रभागाच्या निर्मितीसाठी सत्तर ते ऐंशी प्रगणक गट असतात. एका प्रगणक गटात पाचशे व त्यापुढे लोकसंख्या असते. शासनाने तीन महिन्यांत अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे टार्गेट पालिका प्रशासनाला दिले आहे. मनपा आयुक्त मुख्य समितीच्या अध्यक्ष असून प्रारुप प्रभाग रचना त्या निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु आहे. 4 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

YouTube video player

नाशिक महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभाग असणार आहे. 2017 साली याच पद्धतीने प्रभाग रचना होती. नाशिकची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 14 लाख, 86 हजार, 53 एवढी होती. या लोकसंख्येनुसारच महापालिकेची निवडणूक होणार आहे. नगरविकास विभागाने प्रगणक गटाची मांडणी, स्थळ पाहणी, नकाशे तयार करणे अशा विविध बाबींच्या साहाय्याने प्रारूप प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेत यापूर्वी निवडणूक कक्ष आहे. निवडणुकीचे काम वाढल्याने प्रशासन विभागाने पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती या कक्षासाठी केली आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...