Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याRBI Policy : कर्जाच्या हप्ताबाबतचा निर्णय असा समजून घ्या

RBI Policy : कर्जाच्या हप्ताबाबतचा निर्णय असा समजून घ्या

मुंबई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण जाहीर केले. बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवस चाललेल्या बैठकीनंतर व्याज दरात कोणताही बदल केला गेला नाही. बँकेने रोप रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के ठेवला . तर रिझर्व्ह रोप रेट देखील ३.३ टक्केच कायम ठेवला आहे. कर्जधारकाला मासिक हप्ते लांबीवर टाकण्यासंदर्भातही कोणती घोषणा केली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अर्थव्यवस्थेची परिस्थिती अजूनही कमकुवत आहे. परंतु परकीय गंगाजळी वाढत आहे. महागाई दर नियंत्रणात आहे, असे दास यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या