Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेश"या" तारखेपर्यंत एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांना दुबईत नो एन्ट्री !

“या” तारखेपर्यंत एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांना दुबईत नो एन्ट्री !

दिल्ली | Delhi

- Advertisement -

एअर इंडिया एक्सप्रेसच्या(Air India Express) माध्यमातून ४ सप्टेंबरला आखाती देशांमध्ये कोव्हिड १९ ची बाधा झालेल्या व्यक्तीने प्रवास केल्याची घटना समोर आल्यानंतर दुबई सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने(Dubai Civil Aviation Authority) हा निर्णय घेतला आहे. दुबई सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने एअर इंडिया एक्सप्रेसची सेवा येत्या २ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहे. दुबईत कोणत्याही एअरपोर्टवर ही सेवा देता येणार नाही असे ऑथोरिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. कोव्हीड १९ शी संबंधित नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यासाठीच ही बंदी घालण्यात आली आहे.

ऑथोरिटीकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार दुबईत १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासूनच एअर इंडिया एक्सप्रेसची सर्व उड्डाणे रद्द केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोव्हिड १९ पॉझिटीव्ह प्रवाशाने फ्लाईटने प्रवास करण्याचा प्रकार हा दुसऱ्यांदा घडल्याचे समोर आले आहे. एअरपोर्ट प्रवासासाठी आखण्यात आलेल्या प्रोटोकॉल मोडत अशा पद्धतीचे बेशिस्त वर्तन समोर आल्यानेच ही कारवाई करत आहोत असे ऑथोरिटीने स्पष्ट केले आहे. एकुण १५ दिवसांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हे फ्लाईट्सचे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

या फ्लाईट्सने प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांनी क्वारंटाईन व्हावे. तसेच यासाठीचा येणारा वैद्यकीय खर्च संबंधित यंत्रणांना स्विकारावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोची येथून ही फ्लाईट ऑपरेट झाल्याने कोची एअऱपोर्टलाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. दुबई सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट्सला बंदी घातल्यानेच शाहरजाहला जाणारी एक फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आली आहे. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसनेही घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या