Friday, September 13, 2024
HomeनाशिकNashik News : विधानसभेसाठी मतदारांमध्ये १ लाख ३० हजारांनी वाढ; निवडणुक तयारीला...

Nashik News : विधानसभेसाठी मतदारांमध्ये १ लाख ३० हजारांनी वाढ; निवडणुक तयारीला वेग

प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिध्द

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभा निवडणूकीनंतर (Loksabha Election) भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदार याद्या (Voter List) अद्यावत करण्याचे नियोजन सूरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली असून, नाशिक जिल्हयात गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तूलनेत १ लाख ३० हजार २९७ नवमतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील (District) एकूण मतदारांचा आकडा ४८ लाख ७८ हजार ४५० पर्यंत पोहचला आहे. तर ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : गुरुंना निवृत्त होता येणार नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात एकूण मतदारांची संख्या ४६ लाख ५० हजार ६४० इतकी होती. तर २३ जानेवारी रोजी प्रसिध्द यादीनूसार ४७ लाख ४८ हजार १५३ मतदारांची नोंद करण्यात आली. याच तुलनेत यंदा १ लाख ३० हजार २९७ नवमतदारांची (New Voters) नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

मतदारांची संख्या झपाटयाने वाढत असताना मतदान केंद्रेही वाढली आहेत. जिल्हयात एकूण ४७३९ मतदान केंद्रे आहेत.
प्रत्यक्षात आता १८० मतदान केंद्र वाढली असून, एकूण ४ हजार ९१९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ४१३ तर सर्वात कमी देवळाली २७९ मतदान केंद्रे आहेत. जिल्हयात ८ हजार ८६६ सैन्य दलातील मतदार आहेत. मतदारांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी पाहता ७१.३ टक्के पुरूष तर ७१.८६ टक्के स्त्री मतदार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित

मतदार नोंदणीत युवकांचा सहभाग

नवमतदारांमध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील ८४ हजार ३५ तर २० ते २९ वर्ष वयोगटातील ९ लाख ५१ हजार ८०४ मतदार आहेत. यात २३ जानेवारीनंतर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत १८ वर्ष वयोगटातील २४ हजार ७२१ तर २० ते २९ वर्ष वयोगटातील ६७ हजार ६१ मतदारांची वाढ झाली आहे.

विशेष मोहिमांचा कालावधी

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यात शनिवार १० ऑगस्ट , रविवार ११ ऑगस्ट, शनिवार १७ ऑगस्ट, रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी नाव नोंदणीसाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. २९ ऑगस्टपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई तर ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

आयोगाच्या निर्देशानूसार मतदार यादीच विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाही, असे होऊ नये, यासाठी पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी, त्यांचे नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशिल बरोबर आहे का ते तपासून घेऊन, त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत तो तपशील दुरुस्त करुन घ्यावा.

डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या