Thursday, May 2, 2024
Homeनाशिकज्ञानगंगा प्रवाहित करणारे नूतन विद्या प्रसारक

ज्ञानगंगा प्रवाहित करणारे नूतन विद्या प्रसारक

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

लासलगावसह परिसरातील 84 खेड्यांमध्ये ज्ञानगंगा प्रवाही करण्याचे भगिरथ प्रयत्न करून शिक्षण क्षेत्रातही लासलगावची ओळख करून देणारे शिक्षणमहर्षी गोविंदराव होळकर (Govindrao Holkar) यांनी नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या (Nutan Vidya Prasarak Mandal) जनरल सेक्रेटरी या पदाचे सोने करीत येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा सुरू करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची (Education) उघडी केली…

- Advertisement -

महाविद्यालयाबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून त्यांनी के.जी. पासून 10 वी पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. लासलगाव महाविद्यालयाच्या 32 एकर परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी नानाविध सुविधा निर्माण केल्या. आज या महाविद्यालयाची ओळख सर्वदूर पसरली आहे.

लासलगाव महाविद्यालयाच्या या प्रशस्त इमारतीत विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय इमारत तसेच आता नव्याने बांधकाम असलेली स्पर्धा परीक्षेची भव्य इमारत, जिमखाना इंडोर स्टेडियम, बास्केटबॉल ग्राउंड, गेस्ट हाऊस, गर्ल्स होस्टेल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेची प्रशस्त इमारत, भव्य तरण तलाव, बोटॅनिकल गार्डन, बॉटल गार्डन, रोज गार्डन, नागरिकांसाठी ओपन ग्रीन जिम, विद्यार्थी शिक्षकांसाठी कॅन्टीन, विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी स्वतंत्र रिकल पार्किंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात केलेली वृक्ष लागवड पिण्यासाठी शुद्ध पाणी, शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज कळवा म्हणून हवामान केंद्र, विविध विज्ञान विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा, खुले नाट्यगृह, बत्तीस एकरामध्ये 72 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जे जे नवे तंत्रज्ञान आत्मसात करता येईल ते करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ कसा होईल याकडे गोविंदराव होळकर यांनी लक्ष दिले.

त्यांच्या या प्रयत्नामुळेच महाविद्यालय (College) आज यशस्वी करीत आहेत. भावी पिढी घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्यामुळेच त्यांनी संस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. संस्थेचे चेअरमन संजय होळकर (Sanjay Holkar) तसेच सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक (Dr. Dinesh Naik) आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सतत महाविद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्यानेच हा वटवृक्ष बहरला आहे.

तसेच लासलगाव परिसरासह खेडेगावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा निर्माण झाली आहे. गुणवत्ता आणि पारदर्शकता यामुळे संस्थेसह विद्यालयाचा विकास होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या