येवला | प्रतिनिधी Yevla
शहर पोलिसांनी माळीपुरा भागात छापा टाकून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ६० चक्री नायलॉन मांजा जप्त केला आहे.
प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा माळीपुरा भागातून विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. शहर पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी माळीपुरा भागात कोंबिंग ऑपरेशन केले. यात शफिक हुसेन शेख यांच्या घरातून विक्रीसाठी आणलेला ६० चक्री नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसात शफिक शेख यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 223 सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
लहान मुलाचा कापला हात
मकर संक्रात सण थोड्या दिवसावर येऊन ठेपला असताना शहरात नायलॉन मांजाने अपघात व माणस गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. शहरालगत असणाऱ्या अंगणगाव येथे नऊ वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या मुलाचा नायलॉन मांजाने हात कापल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या यशराजला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या हातास 15 टाके पडले आहेत.