Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLaxman Hake : "तुमच्यात दम असेल तर..."; जरांगेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर लक्ष्मण हाकेंचे थेट...

Laxman Hake : “तुमच्यात दम असेल तर…”; जरांगेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर लक्ष्मण हाकेंचे थेट चॅलेंज

मुंबई | Mumbai

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल (शनिवारी) परभणीत सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी बोलतांना “आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का लागला तर घरात घुसून मारू” असा इशारा दिला होता. तसेच मी आतापर्यंत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेतले नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असेही जरांगे म्हणाले होते.

- Advertisement -

त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या विधानाचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलतांना हाके म्हणाले की, “अशी चितावणीखोर वक्तव्य जरांगे करत असतील तर मला वाटते की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अराजकता निर्माण होईल आणि जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही. तुमच्यात जर दम असेल ना तर कधी, कुठे आणि केव्हा ते सांगा”, असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी थेट जरांगेंना चॅलेंज दिले.

तसेच जरांगे यांच्या मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर (Road) फिरु देणार नाही या वक्तव्याबाबत बोलतांना हाके म्हणाले की,” “मुंडे यांना रस्त्यावर फिरु न द्यायची भाषा करणारे जरांगे कोण आहेत. जरांगे गुंड आहेत, एसपी आहेत, जरांगे आहेत कोण? असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. कायदा (Low) त्यांच्या मालकीचा आहे का? असे म्हणत हाके यांनी अशा धमक्या जरांगेंनी देऊ नये”, असे म्हटले.

दरम्यान, आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये (Pune) मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील हे सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता पुण्यातील मोर्चामध्ये लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विधानावर जरांगे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...