Saturday, July 25, 2026
Homeक्राईमSangamner : हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ 70 लाखांचा गुटखा जप्त

Sangamner : हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ 70 लाखांचा गुटखा जप्त

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि. 5 मे) सकाळी सुमारे 11.30 वाजता स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत तब्बल 69 लाख 79 हजार 400 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या एका आयशर टेम्पोतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह हिवरगाव पावसा टोलनाका परिसरात सापळा रचला.

- Advertisement -

संगमनेरकडून पुण्याकडे जाणारा एमएच 43 बीएक्स 2779 क्रमांकाचा संशयित आयशर टेम्पो आढळून आला. पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून चालक व त्याच्या साथीदारांची चौकशी केली. वाहनाची झडती घेतली असता गोण्यांमध्ये भरलेला मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित वाहन पुढील कारवाईसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या संशयितांनी आपली नावे कन्हैयालाल कालुराम गेहलोत (वय 29, रा. मांडा, ता. मारवाड जंक्शन, जि. पाली, राजस्थान), प्रदीपकुमार हरीशंकर कुंवर (वय 23, रा. मोहरामऊ, ता. हसनगंज, जि. उन्नाव) आणि लक्ष्मण बस्तीराम पवार (वय 22, रा. पुनाईता, ता. पाली, जि. पाली, राजस्थान) अशी सांगितली.

सखोल चौकशीत हा माल गुजरातमधील वापी येथून भरून पुण्यातील निलेश ललवाणी याच्याकडे पोहोचविण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! CJP चे जंतरमंतरवरील आंदोलन अखेर मागे; केंद्र सरकारकडून सर्व...

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन...