Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणासाठी मराठापाठोपाठ ओबीसींचाही मोर्चा

आरक्षणासाठी मराठापाठोपाठ ओबीसींचाही मोर्चा

मुंबई:

मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असतांना आता ओबीसी नेतेही आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहे. यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

- Advertisement -

लसीकरणवर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, केंद्राने दिली ४४ कोटी लसींची ऑर्डर

खासदार संभाजी छत्रपती यांनी शिवराज्याभिषक दिनी १६ जूनपासून मराठा मोर्चाची हाक दिली होती. १६ जून रोजी पहिला मोर्चा कोल्हापुरातून निघणार आहे. मराठापाठोपाठ ओबीसींनीही मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १५ जून रोजी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींकडे मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणासह ओबीसींच्या आरक्षणावरही चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मोर्चाची हाक दिली आहे. एक डेडिटकेटेड आयोग नेमून ओबीसींचा डाटा गोळा करावा. त्यानंतर हा डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करावा. तरच ओबीसींचे आरक्षण टिकेल. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या