Friday, May 3, 2024
Homeनगरन्याय हक्कासाठी आवाज उठविण्याची गरज : झोडगे

न्याय हक्कासाठी आवाज उठविण्याची गरज : झोडगे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओबीसी समाजातील 371 वेगवेगळ्या जाती समाजाला संघटीत करुन राज्यपातळीवर या समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्य पातळीवरील नेत्यांनी आता जिल्ह्यातील ओबीसी संघटनांना एकत्र करुन जनजागृती करुन, जिल्ह्यात संघटीतपणे ताकद दाखवून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी समाजामध्ये सर्व जाती समुहांच्या विविध मागण्या एका झेंड्याखाली मांडण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे म्हणाले.

ओबीसी हक्क परिषदेच्यावतीने सोमवार (दि. 23) रोजी सकाळी 11 वाजता नंदनवन मंगल कार्यालय, टिळकरोड, नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली.

यावेळी ते बोलत होते. यावेळी समता परिषद, जयभगवान महासंघ, नाभिक महामंडळ, तेली समाज संघटना, धनगर महासंघ, मल्हार सेना, ओबीसी परिषद, सावता परिषद, कुंभार समाज, सोनार समाज, गुरव समाज, चांभार समाज, फुले ब्रिगेड, सावता युवक आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आनंद लहामगे म्हणाले, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी औरंगाबाद येथे 5 डिसेंबर येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यासाठी जय भगवान सेनेने तालुकानिहाय बैठका सुरु केल्या आहेत. जिल्हा पातळीवरील मेळाव्यानंतर औरंगाबादच्या मेळाव्यालाही सर्वांनी संघटीतपणे उपस्थित रहाणे गरजेचे आहे.

यावेळी दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, रामदास आंधळे, अर्जुन बोरुडे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर, रमेश सानप, बाबा सानप, माणिकराव विधाते, सुभाष लोंढे, अशोक तुपे, अनिल बोरुडे, जालिंदर बोरुडे, अशोक दहिफळे, नितीन शेलार, निशांत दातीर, मंगल भुजबळ, परेश लोखंडे, नितीन डागवाले, विशाल वालकर, अशोक कानडे, डॉ.श्रीकांत चेमटे, किरण बोरुडे, उमेश शिर्के, युवराज पोटे, तुषार पोटे, विनय देवतरसे, संतोष हजारे, अमित खामकर, संजय गारुडकर, गोरख फुलारी, संदीप हजारे, रावसाहेब भाकरे, निलेश पवळे, रामदास साळुंके, अनिल इवळे, विकी कबाडे, ब्रिजेश ताठे, किरण जावळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या