Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविकीपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर; गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश

विकीपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर; गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे आदेश

छावा चित्रपटाने धुमाकुळ घातलाय. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. (Chhawa ) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

तर दुसरीकडे मात्र, इंटरनेट विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटविण्याची मागणी केली जात आहे. त्यातच हा मजकूर अभिनेता कमाल खाननंदेखील शेअर केला आहे. या सगळ्याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

- Advertisement -

विकीपीडियावरील मजकुराची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. ‘सायबर विभागाच्या आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विकीपीडियावर अशा प्रकारचं लिखाण राहणं चुकीचं आहे. विकीपीडिया भारतातून चालत नाही. तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. पण ऐतिहासिक घटना, व्यक्तींबद्दल असं लिहिलं जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा, असं विकीपीडियाला सांगण्यात येणार आहे,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...