
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
- Advertisement -
माळीवाडा बसस्थानक आणि जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात ये-जा करणार्या नागरिकांना हातवारे करून उपद्रव पसरवणार्या पाच महिलांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी महिला पोलीस शिपाई पल्लवी रोहकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला गेला आहे.
4 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उपअधीक्षक कल्पना पवार व पोलीस पथक गस्त घालत असताना, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना या उपद्रवाबाबत नागरिकांकडून माहिती मिळाली. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता, काही महिला तोंडाला स्कार्फ बांधून नागरिकांना अश्लील हावभाव करत गाणी म्हणताना आढळल्या. सार्वजनिक जागी असभ्य वर्तन आणि लोकांना त्रास दिल्याबद्दल या पाच महिलांवर कोतवाली ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.




