Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजInd Vs Aus : ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला; भारताचा पराभव

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला; भारताचा पराभव

एडिलेड|Adelaide

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना हा एडिलेड येथे खेळवला गेला असून यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेटने पराभव केला. भारताने सीरिजमधील सलग दुसरा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाने यात 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

या पराभवासह भारताचा अ‍ॅडलेडमध्ये 17 वर्षांनंतरचा पहिला वनडे पराभव ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 22 चेंडू राखून आठ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण केले. शुभमन गिलसाठी ही पहिली वनडे मालिका होती ज्यात त्याला कर्णधार म्हणून पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. कर्णधार मिशेल मार्श 11 आणि ट्रॅव्हिस हेड 28 धावांवर माघारी परतले. त्या वेळी संघाचा स्कोअर फक्त 50 होता. मात्र, तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू शॉर्टने मॅट रेनशॉसह 155 धावांची निर्णायक भागीदारी केली. शॉर्टने 78 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 74 धावा केल्या.

भारताकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. रोहितने 97 चेंडूत 73 धावा, तर अय्यरने 77 चेंडूत 61 धावा केल्या. अखेरीस अक्षर पटेलने 41 चेंडूत 44 धावांची झुंज दिली आणि संघाचा स्कोअर 264 पर्यंत नेला. मात्र हा स्कोअर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर अपुरा ठरला.

या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. तिसरा सामना औपचारिक ठरणार असून, भारतासाठी तो प्रतिष्ठेचा लढा असेल.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...