Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! आरोग्य मंत्र्यांवर भर चौकात झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांवर भर चौकात झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

दिल्ली | Delhi

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ जिवघेणा हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला झाला तेव्हा नबा दास एका कार्यक्रमाला जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे.

नाबा दास यांच्यावर हा हल्ला होणं हा पूर्वनियोजित कट होता. कारण त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.

नाबा दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ASI चे नाव गोपाल दास आहे असंही समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल दास यांनी नाबा दास यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या.

नाबा दास यांनी २००४ मध्ये ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २०१४ मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

नाबा दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. नाबा किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे १५ कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास ७० वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास १.१४ कोटी रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या