Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशOmicron हातपाय पसरतोय! भारतात पाचवा रुग्ण सापडला

Omicron हातपाय पसरतोय! भारतात पाचवा रुग्ण सापडला

दिल्ली l Delhi

- Advertisement -

करोना विषाणूचं दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेला ‘ओमिक्रॉन’ हा व्हेरियंट जगभरात हातपाय पसरताना दिसून येतोय. जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं दोन दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केला होता.

करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

कर्नाटकमध्ये दोन करोनाबाधितांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर गुजरात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचे करोनाबाधित सापडले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले….

त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला करोना रुग्ण आढळल्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्णांची देशातील संख्या आता पाचवर गेली आहे.

नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट संसर्ग झालेला ३७ वर्षीय रुग्ण हा टांझानियातून आला होता. या रुग्णाला लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या