Thursday, May 9, 2024
Homeजळगावविजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोन्याला मिळाली झळाली

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोन्याला मिळाली झळाली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तांपैकी (three and a half muhurtas) एक मुहूर्त असणार्‍या विजयादशमी सणाला (Vijayadashami festival) अन्ययसाधारण महत्व आहे. मंगळवारी दसर्‍याच्या पूर्वसंध्येला सोने,चांदी, वाहन बाजार आणि कपड्यांची खरेदी (buy) करण्यासाठी जळगावची बाजारपेठे गर्दीने (Market of Jalgaon) फुलली (Crowded) होती. झेंडूची फुलेही (Marigold flowers) भाव वधारला आहे.

- Advertisement -

दसर्‍याला सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा यासह सरस्वती पूजनही केले जाते. विजयादशमी या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता मंगळवारी शहरातील बाजारपेठे नवीन कापडे खरेदी करण्यासाठी महिलांसह नागरिकांची दुकानात गर्दी झाली होती. शहरातील आर.सी.बाफना, भंगाळे गोल्ड, ललवाणी ज्वेलर्स यांच्यासह सोन्या- चांदीच्या दुकानात देखील सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. यंदा पितृपक्षातासून सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून मंगळवारी सोन्याचे भाव 52 हजार रुपये होता. दसर्‍यादेखील सोने खरेदीसाठी गर्दी वाढण्याचा विश्वास सोने -चांदी विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी वर्तविला आहे. त्यामुळे यंदा सोने-चांदीला सुगीचे दिवस आले आहे.

झेंडू 80 रुपये किलो

उद्या दि. 5 ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने शहरात मंगळवारी लाल व पिवळा झेंडू बाजारात दाखल झाला आहे. विजयादशमीच्या पूर्व संध्येला 80रुपये किलो प्रमाणे झेंडू भाव होता. दसर्‍याच्या दिवशी फुलांची आवक वाढल्यास भाव स्थिर राहील. जर बाहेर गावाहून माल न दाखल झाल्यास भाव वधारण्याची शक्यता आहे, श्री साई फुल भांडारचे चंद्रकांत सिनकर यांनी सांगितले.

दसर्‍याच्या पूर्वसंध्येला सोने खरेदी करण्यासाठी आज दिवसभर आर.सी.बाफनासह विविध ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी होती. नवीन व्हरायटीचे दागिने, शिक्के, बनविलेले दागिणे ग्राहकांसाठी दालनात उपलब्ध केले असून सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दसर्‍यादेखील नागरिकांची गर्दी होईल, असा विश्वास आहे.

मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी.बाफना,ज्वेलर्स

- Advertisment -

ताज्या बातम्या