Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारऋषिपंचमीच्या पर्वावर प्रकाशा येथील तीर्थक्षेत्रावर ७५ हजार महिलांचे पवित्र स्नान

ऋषिपंचमीच्या पर्वावर प्रकाशा येथील तीर्थक्षेत्रावर ७५ हजार महिलांचे पवित्र स्नान

प्रकाशा Prakasa | वार्ताहर

ऋषीपंचमीच्या (Rishi Panchami) पर्वावर येथील दक्षिण काशी (pilgrimage site) म्हणून ख्यातीप्रप्त असलेल्या तीर्थक्षेत्रावर आज सुमारे पंचाहत्तर हजारावर महिलांनी (women) स्नान (holy bath) केले.

- Advertisement -

दक्षिण काशी म्हणून ख्यातिप्रप्त प्रकाशा ता. शहादा येथील केदारेश्वर मंदिराला आज ऋषीपंचमीच्या पर्वावर लाखो भाविकांनी भेट दिली. यावेळी सुमारे ७५ हजार महिलांनी तापीपत्रात पवित्र स्नान केले. पहाटेपासूनच महिलांनी गर्दी केली होती. याप्रसंगी केदारेश्वर महादेव दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.

मंदिरापासून एक दीड किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व महाराष्ट्र खानदेश, गुजरात, जळगाव, भुसावळ, खेतीया शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर व सातपुडा पठारी भागातील हजारो महिला भाविकांनी येथे हजेरी लावली होती. दक्षिण काशी म्हणून संबोधले जाणारे केदारेश्वर महादेव मंदिराचे दर्शनासाठी एकच द्वारपर्यंत दर्शन घेऊन याच मार्गाने परत निघावे लागत असल्याने  भाविकांना दर्शनासाठी दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागले.

काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशीच्या प्राचीन ओट्यावर दर्शनासाठी महिलांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. संत दगाजी महाराज यांचा समाधी मंदिरातही भावकांची अमाप गर्दी दिसून आली.

मंदिर विश्वस्त कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, दिलीप पाटील, मोहन काशिनाथ पाटील, सुरेश पूना पाटील आदींनी परिश्रम घेतले. मंदिर परिसरात धार्मिक साहित्य चा दुकानं थाटली होती. तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने महिला भाविकांनी पवित्र स्नान करण्याचा लाभ घेतला. प्रकाशा, शहादा, नंदुरबार येथील पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या