Monday, July 15, 2024
Homeमुख्य बातम्यापहिल्याच दिवशी हेल्मेटसक्तीतून झाला 'इतका' दंड वसुल

पहिल्याच दिवशी हेल्मेटसक्तीतून झाला ‘इतका’ दंड वसुल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशकात (nashik) दुचाकीच्या अपघातात (accidents) दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण बघता पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) (दि.1) हेल्मेटसक्ती (Helmet) लागू केली होती.

या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 554 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 2 लाख 77 हजार दंड वसुली (Recovery of fines) करण्यात आली. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (Former Police Commissioner Deepak Pandey) यांनी हेल्मेटचा वापर न करणार्‍या

दुचाकीचालकांना तब्बल दोन तासांचे समुपदेशन (counselling), नो हेल्मेट, नो एन्ट्री (No helmet, no entry) आणि नंतर नो हेल्मेट, नो पेट्रोल (No helmet, no petrol) असे विविध उपक्रम राबवत नाशकात हेल्मेटसक्ती केली होती. परंतु त्यांच्या बदलीनंतर हेल्मेटसक्तीची कारवाई थंडावली होती. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे 83 चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले.

यामुळे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी कठोर भूमिका घेत हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे (Penal action) आदेशित करण्यात आले होते. यावरून (दि.1) पहिल्याच दिवशी वाहतूक शाखेतर्फे सहाय्यक आयुक्त वसंत मोरे (Assistant Commissioner Vasant More on behalf of the Transport Department) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी हेल्मेटचा वापर न करणार्‍या

दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान ही कारवाई दररोजच सुरु राहणार असल्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या