Sunday, May 19, 2024
Homeजळगावया प्रसंगाने घडला गानकोकिळेपर्यंतचा प्रवास

या प्रसंगाने घडला गानकोकिळेपर्यंतचा प्रवास

लतादीदींचा नाट्यसंगीत आणि शास्त्रीय गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या नवव्या वर्षी सोलापुरात झाला होता, सरस्वती चौकाजवळील जीवनतारा बंगल्याच्या मोकळ्या जागेतील नूतन संगीत नाट्यगृहात 9 सप्टेंबर 1938 रोजी झालेल्या शास्त्रीय संगीत जलसामध्ये लतादीदींनी खंबावती रागातील चीज व दोन नाट्यगीते सादर करून आपल्या गानकलेचा ठसा उमटवला होता. त्यानंतर लतादिदींच्या गायन कलेची कारकिर्द 1942 साली सुरु झाली होती. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी लतादिदींनी पार्श्वगायन केले होते.

मास्टर दीनानाथ यांना बघण्यासाठी अनेकजण आले होते. पडदा उघडला. दीनानाथ यांच्या मागे काटकोळी पण तेजस्वी डोळ्यांची लता तंबोरा घेऊन बसली होती. या कार्यक्रमात दीनानाथ यांचा आवाज लागत नव्हता. ते विलक्षण थकलेले दिसत होते. त्यामुळे त्यांचा आवाज नीट लागत नव्हता. एकदोन रागातल्या चिजा व एक नाट्यपद त्यांनी कसेबसे सादर केले. प्रयत्न करूनही त्यांचा आवाज वर जाईना. ते बाजूला झाले.

- Advertisement -

लताला पुढे यायची खूण केली आणि म्हणाले, आता हिचे गाणे ऐका. लता सरसावून बसली आणि तिने पहिलाच स्वर असा लावला की ते सगळे दरिद्री मरगळलेले सभागृह सोनेरी चैतन्याने झगमगू लागले. दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आवाज म्हणजे काय असतो, याचा सर्वाना घडलेला तो साक्षात्कार होता. थरारून टाकणारा क्षणात दिव्यत्वाचे दर्शन घडवणारा सुरेल, सर्वांगसुंदर, सोनेरी साक्षात्कार! मघाशी एवढीशी दिसणारी चिमुरडी लता आता आभाळाहून मोठी दिसत होती. तो दिवस, स्वरानुभव सर्वांच्या अंतकरणावर कायमचा कोरला गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या