Sunday, June 8, 2025
Homeदेश विदेशदुबईत भारतीय करोना रुग्णाचे एक कोटीचे बिल माफ

दुबईत भारतीय करोना रुग्णाचे एक कोटीचे बिल माफ

नवी दिल्ली – राजेश ओडनाला (42 वर्षे) या भारतीय नागरिकाला दुबईत करोनाची लागण झाली आणि त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आणि 80 दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला, परंतु सुटीच्या वेळी त्याच्या हातात तब्बल 1 कोटी 52 लाख रुपयांचे बिल देण्यात आले, मात्र भारतीय राजदूताच्या मध्यस्थीमुळे रुग्णालयाने माणुसकीच्या नात्याने त्याचे एक कोटीचे देयक माफ केले. तो मूळ तेलंगणातील जगतियाल जिल्ह्याचा रहिवासी आहे.

- Advertisement -

23 एप्रिल रोजी राजेश यांची प्रकृती बिघडली. राजेश यांना गल्फ वर्कर प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरिंसहा यांनी रुग्णालयात दाखल केले होते. या वाढीव देयकाबाबत नरिंसहा यांनी भारतीय राजदूत हरजितिंसग यांना याची कल्पना दिली.

हरजित सिंग यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला पत्र लिहून मानवतेच्या दृष्टीने निर्णय घेत देयक माफ करण्याची विनंती केली. रुग्णालय प्रशासनाने देयक तर माफ केलेच, शिवाय राजेश व त्यांच्या सहकार्‍याला हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था केली व खर्चासाठी 10 हजार रुपये दिलेत. राजेश 14 जुलै रोजी एअर इंडियांच्या विमानाने भारतात परतले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard : वाकडी परिसरात बिबट्यांची दहशत

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata तालुक्यातील वाकडी भागात चार बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. बिबट्यांनीवाकडी च्या लबडे वस्ती भागातील सर्व कुत्रे फस्त केले असून एकही कुत्रे ठेवले...