Monday, May 6, 2024
Homeजळगावजिल्हा बँकेकडे मनपाचे एक कोटी लिंकिंग शेअर्स

जिल्हा बँकेकडे मनपाचे एक कोटी लिंकिंग शेअर्स

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेकडे (District Bank) मनपाची लिंकिंग शेअर्स (Corporation Linking Shares) अंदाजे रक्कम एक कोटी रुपये आहेत. बँक तोट्यात असल्याचे कारण देत जिल्हा बँकेने ही रक्कम (Amount) मनपाला देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यासंदर्भातील बँकेच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) बैठकीत ठराव मंजूर करून एक कोटी रक्कम मनपाला परत मिळवून द्यावी. जेणेकरून त्या रकमेचा शहराच्या विकासासाठी (Development of the city) उपयोग होईल अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे (Bharatiya Janata Party) महापौर (Mayor) तथा जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री महाजन (Jayashree Mahajan) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावेळी जळगाव महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, मनपा गटनेते भगत बालानी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नगरसेवक धिरज सोनवणे, जितेंद्र मराठे, भरत सपकाळे, किशोर चौधरी, महेश चौधरी, ललित खडके, शोभा बारी आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

महापालिकेवर (Municipal Corporation) जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्यावेळी एकरकमी कर्जफेडीसाठी (Debt repayment) सहकार्य केले नव्हते. महानगरपालिका आर्थिक अडचणीत होती. त्यावेळी तत्कालीन सरकारने (government) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.गिरीश महाजन , आ. राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात हुडकोच्या (Hudco) कर्जाच्या संदर्भात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadichi) सत्ता आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन हे शहरातील नागरिक असून या महापालिकेचे नगरसेवक राहून चुकले आहेत. त्यांना महापालिकेचा आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. जिल्हा बँक ही अ वर्गात आली असून बँकेच्या संचित तोटा (Accumulated loss) कमी होऊन, बँक नफ्यात आली आहे असे मतदारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे बँकेची परिस्थितीत सुधारणा झाली असल्याने बँकेने लिंकिंग शेअर्स ची रक्कम परत करावी अशी मागणी (Demand) करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या