Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedधक्कादायक : औरंगाबादेत सिलिंडरचा एकाच दिवसाचा बफर स्टॉक शिल्लक

धक्कादायक : औरंगाबादेत सिलिंडरचा एकाच दिवसाचा बफर स्टॉक शिल्लक

औरंगाबादेत – Aurangabad

औरंगाबाद- शहरात कोरोना रुग्णांची संख्येत मोठी वाढ होत आहे. एक मार्चला असलेली १४.८२ मेट्रि टन ऑक्सिजनची मागणी सोमवारी ५४ मेट्रिक टनावर पोहोचली. मागणीत चार पटीने वाढ झाल्याने बफर स्टॉक केवळ एक दिवसाचा शिल्लक आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. मागील वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मार्च २०२० ते डिसेंबर २०२०पर्यंत करोना रुग्णांमध्ये गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित होती. फेब्रुवारी २०२१नंतर ही संख्याही वाढली. त्यासह घरगुती ऑक्सिजन वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे रुग्णालयांसह घरगुती ऑक्सिजन वापरासाठीच्या सिलिंडरची मागणी एका महिन्यातच चार पटीने वाढली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादमध्ये ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग पुरवठादारांकडे दोनशे ते अडिचशे सिलिंडरची मागणी असायची हा आकडा नऊशे ते एक हजारच्या आसपास आहे. यामध्ये जम्बो सिलिंडरची संख्या अधिक आहे. रुग्णालयांसह घरगुती ऑक्सिजन वापर करणाऱ्या रुग्णांसाठीही जम्बो सिलिंडरची मागणी वाढली असल्याचे सांगण्यात येते.

घरगुती रुग्णांसाठी दीड किलोच्या सिलिंडरची मागणी कमी आहे. वाढती मागणी लक्षात घेत अधिकचे सिलिंडरचा साठा वाढविण्याच्या सूचना औषधी विभागाने संबंधितांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. औरगाबादला सध्या रोज ५० मेट्रिक टनाची मागणी नोंदविली जात आहे. यात मोठ्या रुग्णालयांना लिक्विडचा टँकरद्वारे पुरवठा होतो. औषधी विभागाच्या आकडेवारीनुसार एक मार्च २०२१ रोजी औरंगाबादला १४.८२ मेट्रीक टनाची मागणी होती जी आज चार पटीने वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या