Thursday, May 2, 2024
Homeजळगावपाळधी दूरक्षेत्र कॉन्स्टेबलला एक दिवस पोलीस कोठडी

पाळधी दूरक्षेत्र कॉन्स्टेबलला एक दिवस पोलीस कोठडी

जळगाव : Jalgaon

अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी 15 हजाराची लाच स्विकारणार्‍या पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबल सुमीत संजय पाटील (27,रा.निवृत्ती नगर, जळगाव) यास 12 जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

भुसावळ येथील 27 वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. या अपघाताच्या गुन्ह्यात वाहन ताब्यात घेण्यात आलेले असून या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे व वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबल सुमीत पाटील याने 29 डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे 15 हजाराची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार 11 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात सापळा रचनू कॉन्स्टेबल सुमीत पाटील याला तक्रारदाराकडून 15 हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुमित पाटील यास जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या