Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनवीन नाशिक : अपघात एकाचा मृत्यू

नवीन नाशिक : अपघात एकाचा मृत्यू

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

अंबड परिसरात एका ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण देवीदास याळसे (वय २१, रा. येस बँकेसमोर, पवनननगर) यांनी एमएच १५ एएन ७९५७ या क्रमांकाची दुचाकी भरधाव चालवून राजेंद्र मुरलीधर मुसळे (वय ६३, रा. रायगड चौक, पवननगर) यांना जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले.

त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मुळे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या