Thursday, May 2, 2024
Homeजळगावपातोंडा येथे एक जण करोना पॉझिटिव्ह

पातोंडा येथे एक जण करोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा येथे एक ६० ते ६५ वर्षीय वृध्दाला करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याला त्रास होत असल्याने जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

- Advertisement -

त्याठिकाणी त्यांच्या स्वॅबची तपासणी केली असता ते आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती मिळताच पातोंडा येथे तहसीलदार अमोल मोरे, वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.डी.के.लांडे, गटविकास आधिकारी आदिनी भेट देवून पाहणी केले.

तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कोरोना बाधित हा मार्केटमध्ये शेतमाल विक्रीसाठी चाळीसगाव, औरंगाबाद येथे जावून आल्याची माहिती प्राप्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या