येवला । प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील येवला- धामणगाव रोडवर अल्टो कार आणि दुचाकी अपघात एक ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
- Advertisement -
विनोद विश्वनाथ कांबळे व उषा विनोद कांबळे हे पती-पत्नी सायगाव येथून दुचाकीने येवल्याकडे येत होते. तर अल्टो कार कौटखेड्या कडे चालला होता. अल्टो कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील कांबळे पती पत्नी गंभीर जखमी झाले. तर कार चालक सिकंदर दलिल शेख हाही या अपघातात गंभीर जखमी झाला. सदर घटना शुक्रवारी, (दि. १३) दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान विनोद कांबळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.





